१३६. हमी
बांधू शकणार नाही ताज
तुझ्यासाठी मी
तरी सुद्धा माझं प्रेम
मुळीच नाही कमी
पैसाही नाही माझ्याकडे
शहाजहान एवढा
हृदयात माझ्या असेल पण
ध्यास तुझाच तेवढा
विश्वास ठेव माझ्यावर
नसलो जरी शहाजहान
तुझ्यासाठी ठेवीन मी
जीवही माझा गहाण
एवढं सगळं सुद्धा जर
वाटत असेल तुला कमी
तुझ्याच सोबत मरण्याची
ती सुद्धा देतो हमी
--- लबाड बोका
बांधू शकणार नाही ताज
तुझ्यासाठी मी
तरी सुद्धा माझं प्रेम
मुळीच नाही कमी
पैसाही नाही माझ्याकडे
शहाजहान एवढा
हृदयात माझ्या असेल पण
ध्यास तुझाच तेवढा
विश्वास ठेव माझ्यावर
नसलो जरी शहाजहान
तुझ्यासाठी ठेवीन मी
जीवही माझा गहाण
एवढं सगळं सुद्धा जर
वाटत असेल तुला कमी
तुझ्याच सोबत मरण्याची
ती सुद्धा देतो हमी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा