१३७. निरर्थक
प्रयत्न करतो भेटण्याचा
स्वप्नातही भेटत नाही
असा कसा मला तुझा
थांगपत्ताच लागत नाही
जगतो आहे तुझ्याशिवाय
पण हे काही जगणं नाही
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
तुलाच धुंडतो दिशा दाही
सारं काही आहे माझ्याकडे
तेवढी फक्त तूच नाही
तुझ्याशिवाय ह्या सा-याला
खरंच काही अर्थ नाही
--- लबाड बोका
प्रयत्न करतो भेटण्याचा
स्वप्नातही भेटत नाही
असा कसा मला तुझा
थांगपत्ताच लागत नाही
जगतो आहे तुझ्याशिवाय
पण हे काही जगणं नाही
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
तुलाच धुंडतो दिशा दाही
सारं काही आहे माझ्याकडे
तेवढी फक्त तूच नाही
तुझ्याशिवाय ह्या सा-याला
खरंच काही अर्थ नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा