१४१. पारिजात
रात्री येतो वाऱ्याबरोबर
तोच परिचित मादक गंध
वाटतं तेव्हा उत्कटतेने
तोडून टाकावेसे बंध
तू ही असतेस तशीच पण
शांत आणि पुरती अबोल
कधी सुटणार आहे आणि
तुझा सावरलेला तोल
आहे मला पहायचा गं
तुझा बहरलेला पारिजात
म्हणून येईन म्हणतो मी
होईल जेव्हा मध्य रात
--- लबाड बोका
रात्री येतो वाऱ्याबरोबर
तोच परिचित मादक गंध
वाटतं तेव्हा उत्कटतेने
तोडून टाकावेसे बंध
तू ही असतेस तशीच पण
शांत आणि पुरती अबोल
कधी सुटणार आहे आणि
तुझा सावरलेला तोल
आहे मला पहायचा गं
तुझा बहरलेला पारिजात
म्हणून येईन म्हणतो मी
होईल जेव्हा मध्य रात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा