१४४. अगतिक
आज सापडली जुनी वही
आणि अचानक बसला घाव
शेवटच्या पानावरती होतं
मीच लिहिलेलं तुझं नाव
मन पुन्हा गेलं मागे
आणि नकळत फुटलं रडू
पुन्हा एकदा गिळले मी
दुख्खाचे ते घोट कडू
पुन्हा पडली जखम उघडी
पुन्हा झाल्या वेदना कितीक
तशीच टाकली मिटून वही
बसून राहिलो आणि अगतिक
--- लबाड बोका
आज सापडली जुनी वही
आणि अचानक बसला घाव
शेवटच्या पानावरती होतं
मीच लिहिलेलं तुझं नाव
मन पुन्हा गेलं मागे
आणि नकळत फुटलं रडू
पुन्हा एकदा गिळले मी
दुख्खाचे ते घोट कडू
पुन्हा पडली जखम उघडी
पुन्हा झाल्या वेदना कितीक
तशीच टाकली मिटून वही
बसून राहिलो आणि अगतिक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा