१५२. ओवाळणी
देत असतेस रोज नकार
तेही गोड हसून
तरीही करतो प्रेम तुझ्यावर
तेही मनापासून
माहित नाही होईल का
प्रेम माझं सफल
घेत नाहीस अजून तू
काहीच माझी दखल
वाटतं मला कुठेतरी
होईल तुला उपरती
येईल तेव्हा आनंदाने
प्रेमास माझ्या भरती
अशीच स्वप्नं रंगवतो मी
बसतो वाट बघत
तू काही येत नाहीस
तरीही असतो जगत
असाच जाईन मी मग
एके दिवशी मरून
मरतानाही टाकीन ओवाळून
जीव तुझ्यावरून
--- लबाड बोका
देत असतेस रोज नकार
तेही गोड हसून
तरीही करतो प्रेम तुझ्यावर
तेही मनापासून
माहित नाही होईल का
प्रेम माझं सफल
घेत नाहीस अजून तू
काहीच माझी दखल
वाटतं मला कुठेतरी
होईल तुला उपरती
येईल तेव्हा आनंदाने
प्रेमास माझ्या भरती
अशीच स्वप्नं रंगवतो मी
बसतो वाट बघत
तू काही येत नाहीस
तरीही असतो जगत
असाच जाईन मी मग
एके दिवशी मरून
मरतानाही टाकीन ओवाळून
जीव तुझ्यावरून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा