१५४. असर
ऐकू येतो अधून मधून
देवळामधला घंटानाद
उगाच वाटत रहातं मला
तूच अजून घालतेस साद
अशीच बोलवायचीस तू मला
मी सुद्धा यायचो धावत
इतक्यांदा भेटूनही आनंद तुझा
कधीच नव्हता गगनात मावत
इतकी वर्षं गेली उलटून
पडत नाहीय अजून विसर
तू अशी भिनलीयस माझ्यात
कमीच होत नाहीय असर
--- लबाड बोका
ऐकू येतो अधून मधून
देवळामधला घंटानाद
उगाच वाटत रहातं मला
तूच अजून घालतेस साद
अशीच बोलवायचीस तू मला
मी सुद्धा यायचो धावत
इतक्यांदा भेटूनही आनंद तुझा
कधीच नव्हता गगनात मावत
इतकी वर्षं गेली उलटून
पडत नाहीय अजून विसर
तू अशी भिनलीयस माझ्यात
कमीच होत नाहीय असर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा