१५५. आरास
असायचो मी घुटमळत
तुझ्याच अवती भवती
तुलाच पण कधी तशी
फिकीर माझी नव्हती
वाटायचं खूप वाईट मला
व्हायचो खूप निराश
तू फक्त हो म्हणायचा
तेवढाच होता अवकाश
तुझ्यासाठी केली होती
मनात माझ्या आरास
बांधून सुद्धा ठेवली होती
तोरणं दारादारांस
उतरलंच नाही पण कधी
स्वप्न माझं सत्यात
आरास अजून आहे तशीच
फक्त तू नाहीस त्यात
--- लबाड बोका
असायचो मी घुटमळत
तुझ्याच अवती भवती
तुलाच पण कधी तशी
फिकीर माझी नव्हती
वाटायचं खूप वाईट मला
व्हायचो खूप निराश
तू फक्त हो म्हणायचा
तेवढाच होता अवकाश
तुझ्यासाठी केली होती
मनात माझ्या आरास
बांधून सुद्धा ठेवली होती
तोरणं दारादारांस
उतरलंच नाही पण कधी
स्वप्न माझं सत्यात
आरास अजून आहे तशीच
फक्त तू नाहीस त्यात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा