१५६. काफी
माहित असतं तुला चांगलं
मी असतो तिथे
पहात असतो तुझ्याकडेच
जाशील जिथे जिथे
पाहूनही करतेस तू
न पाहिल्यासारखं
झालं तरी काय एवढं
वागतेस असं तिरकं
सांगितलीस तर कळेल ना
काय माझी चूक
तेवढ्यासाठी तरी निदान
राहू नकोस मूक
नसेल जरी चूक तरी
मागतो तुझी माफी
तुझं फक्त प्रेम हवं
तेवढंच मला काफी
--- लबाड बोका
माहित असतं तुला चांगलं
मी असतो तिथे
पहात असतो तुझ्याकडेच
जाशील जिथे जिथे
पाहूनही करतेस तू
न पाहिल्यासारखं
झालं तरी काय एवढं
वागतेस असं तिरकं
सांगितलीस तर कळेल ना
काय माझी चूक
तेवढ्यासाठी तरी निदान
राहू नकोस मूक
नसेल जरी चूक तरी
मागतो तुझी माफी
तुझं फक्त प्रेम हवं
तेवढंच मला काफी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा