१५७. पाषाणहृदयी
नको बोलूस तू आता
अशी काही भाषा
दाखवलीस तरी का मग
उगाच वेडी आशा
चाललीस तरी कुठे अशी
सांग मला सोडून
तुझ्याशिवाय कसा जगू
जाईन गं मी मोडून
माहित आहे तुला चांगलं
सांगतो तसं करेन
तुझ्या आठवणींत मी
झुरून झुरून मरेन
सांगतोय तुला कळवळून
अजून विचार कर
असा कसा फुटत नाही
हृदयाला तुझ्या पाझर
झालो होतो मी गं
एकरूप तुझ्या ठायी
पण तू मात्र कशी अशी
एकदम पाषाणहृदयी
--- लबाड बोका
नको बोलूस तू आता
अशी काही भाषा
दाखवलीस तरी का मग
उगाच वेडी आशा
चाललीस तरी कुठे अशी
सांग मला सोडून
तुझ्याशिवाय कसा जगू
जाईन गं मी मोडून
माहित आहे तुला चांगलं
सांगतो तसं करेन
तुझ्या आठवणींत मी
झुरून झुरून मरेन
सांगतोय तुला कळवळून
अजून विचार कर
असा कसा फुटत नाही
हृदयाला तुझ्या पाझर
झालो होतो मी गं
एकरूप तुझ्या ठायी
पण तू मात्र कशी अशी
एकदम पाषाणहृदयी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा