१५८. भूल
मी ही असतो तुझ्यासारखाच
आतल्या आत जळत
तुला वाटतं तुझ्या मनातलं
मला नाही कळत
मलासुद्धा असतं चेतवत
रात्रीचं हे चांदणं
तुझ्यासारखीच मलासुद्धा
आहेतच ना पण बंधनं
माझंसुद्धा जडलंय मन
पण कसं करू कबूल
माझंच मला वाटत रहातं
करत नाही ना भूल
--- लबाड बोका
मी ही असतो तुझ्यासारखाच
आतल्या आत जळत
तुला वाटतं तुझ्या मनातलं
मला नाही कळत
मलासुद्धा असतं चेतवत
रात्रीचं हे चांदणं
तुझ्यासारखीच मलासुद्धा
आहेतच ना पण बंधनं
माझंसुद्धा जडलंय मन
पण कसं करू कबूल
माझंच मला वाटत रहातं
करत नाही ना भूल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा