१६२. विचित्र
कधी बोलतेस कधी भांडतेस
कधी धरतेस अबोला
कधी म्हणतेस चक्क नाही
कधी हो म्हणतेस हो ला
कधी पुरवतेस लाड माझे
कधी टाकतेस उतरवून साफ
कधी करतो चुका तरीही
करून टाकतेस सरळ माफ
कधी देतेस जीव जीवाला
कधी करतेस मी मी तू तू
कळत नाही मला काहीच
कशी आहेस नेमकी तू
--- लबाड बोका
कधी बोलतेस कधी भांडतेस
कधी धरतेस अबोला
कधी म्हणतेस चक्क नाही
कधी हो म्हणतेस हो ला
कधी पुरवतेस लाड माझे
कधी टाकतेस उतरवून साफ
कधी करतो चुका तरीही
करून टाकतेस सरळ माफ
कधी देतेस जीव जीवाला
कधी करतेस मी मी तू तू
कळत नाही मला काहीच
कशी आहेस नेमकी तू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा