१६४. दुर्लभ
रोज बघतो वाट तुझी
उभा असतो ताटकळत
मी झुरतो तुझ्यासाठी
तुला कसं नाही कळत
तुझ्या एका कटाक्षासाठी
असतो मी तळमळत
लक्षात माझ्या येत नाही
माझंच चारित्र्य असतं मळत
तुझाच कीडा रात्रंदिवस
डोक्यात असतो वळवळत
तू आहेस दुर्लभ तशी
कळतंय पण नाही वळत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा