१६६. रोमांच
दिसली ती पहिल्यांदा
तेव्हाच भरली मनात
वाटली होती खरंतर
तिच्याबद्दल ओढ
ओळखही नव्हती तेव्हा
तिची नी माझी साधी
चुकून पाहिलं तिने तरी
कित्ती वाटलं बरं
अशीच काही कारणाने
झाली तिच्याशी ओळख
वाटू लागली मनात आणि
थोडी थोडी आशा
बोलू लागली तीही मग
खूपच आपुलकीने
आनंद माझा गगनात
झाला मावेनासा
असाच एकदा तिने
धरला माझा हात
रोमांच की काय ते
उठले अंगावरती
--- लबाड बोका
दिसली ती पहिल्यांदा
तेव्हाच भरली मनात
वाटली होती खरंतर
तिच्याबद्दल ओढ
ओळखही नव्हती तेव्हा
तिची नी माझी साधी
चुकून पाहिलं तिने तरी
कित्ती वाटलं बरं
अशीच काही कारणाने
झाली तिच्याशी ओळख
वाटू लागली मनात आणि
थोडी थोडी आशा
बोलू लागली तीही मग
खूपच आपुलकीने
आनंद माझा गगनात
झाला मावेनासा
असाच एकदा तिने
धरला माझा हात
रोमांच की काय ते
उठले अंगावरती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा