१६८. धुवांधार
भरून आलंय आभाळ पण
पडत नाहीय अजून
ती ही पहातेय माझ्याकडे
मध्येच लाजून लाजून
कळली आहे तिला सुद्धा
मनाची माझ्या घालमेल
आज वाटतं मनामधून
तिचं नी माझं जमेल
वाट पहातोय पावसाची
कधी धरेल धार
बरसायचंय मलासुद्धा
पावसासारखंच धुवांधार
--- लबाड बोका
भरून आलंय आभाळ पण
पडत नाहीय अजून
ती ही पहातेय माझ्याकडे
मध्येच लाजून लाजून
कळली आहे तिला सुद्धा
मनाची माझ्या घालमेल
आज वाटतं मनामधून
तिचं नी माझं जमेल
वाट पहातोय पावसाची
कधी धरेल धार
बरसायचंय मलासुद्धा
पावसासारखंच धुवांधार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा