१७२. इच्छा
उगाच घेत असतात लोक
तुझ्यावरती आळ
मीच झालोय आपणहून
पाहून तुला घायाळ
तुझ्यामुळेच मदन बाण
घुसलाय माझ्या काळजात
होतो नाहीतर मी ही
शत्रू एकदम अजात
लागला आहे आता मला
ध्यास तुझ्याच प्राप्तीचा
वाटेल तेव्हाच समाधान
घेईन आनंद तृप्तीचा
कल्पना करवत नाही आता
तुझ्याशिवाय जगण्याची
मारावीशी वाटते मला
गाठ तुझ्याशी लग्नाची
--- लबाड बोका
उगाच घेत असतात लोक
तुझ्यावरती आळ
मीच झालोय आपणहून
पाहून तुला घायाळ
तुझ्यामुळेच मदन बाण
घुसलाय माझ्या काळजात
होतो नाहीतर मी ही
शत्रू एकदम अजात
लागला आहे आता मला
ध्यास तुझ्याच प्राप्तीचा
वाटेल तेव्हाच समाधान
घेईन आनंद तृप्तीचा
कल्पना करवत नाही आता
तुझ्याशिवाय जगण्याची
मारावीशी वाटते मला
गाठ तुझ्याशी लग्नाची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा