१७४. तुझ्यासाठीच
लक्ष तुझं वेधण्यासाठी
काय काय असतो करत
केवळ तू पहावंस म्हणून
नुसता असतो मरत
तुझा विचार आल्याशिवाय
क्षणही नाही सरत
लांबून लांबून पाहून तुला
आंहे असतो भरत
दिसतेसच तू सुंदर एवढी
नजरच नाही ठरत
समोर तू दिसतेस तरी
संयम असतो धरत
तुझ्या दिव्य सौंदर्यापुढे
नेहमीच आलोय हरत
सगळं सगळं काही सोडून
तुझ्यासाठी आलोय परत
--- लबाड बोका
लक्ष तुझं वेधण्यासाठी
काय काय असतो करत
केवळ तू पहावंस म्हणून
नुसता असतो मरत
तुझा विचार आल्याशिवाय
क्षणही नाही सरत
लांबून लांबून पाहून तुला
आंहे असतो भरत
दिसतेसच तू सुंदर एवढी
नजरच नाही ठरत
समोर तू दिसतेस तरी
संयम असतो धरत
तुझ्या दिव्य सौंदर्यापुढे
नेहमीच आलोय हरत
सगळं सगळं काही सोडून
तुझ्यासाठी आलोय परत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा