१७६. उचकी
धडधड तुझ्या काळजाची
ऐकू येते मला इथे
दूर मी असलो तरी
लक्ष माझं असतं तिथे
तुला जरा खुपलं तरी
लगेच मला कळतं
कसं काय ठाऊक नाही
काळीच माझं जळतं
तू आहेस साऱ्यांहून
काळजाजवळ इतकी
आठवण तिथे काढलीस तरी
लागते इथे उचकी
--- लबाड बोका
धडधड तुझ्या काळजाची
ऐकू येते मला इथे
दूर मी असलो तरी
लक्ष माझं असतं तिथे
तुला जरा खुपलं तरी
लगेच मला कळतं
कसं काय ठाऊक नाही
काळीच माझं जळतं
तू आहेस साऱ्यांहून
काळजाजवळ इतकी
आठवण तिथे काढलीस तरी
लागते इथे उचकी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा