१८३. ठिणगी
आधीच आहे मनात माझ्या
तिच्याबद्दल ओढ
त्यात अचानक आली समोर
हसली एकदम गोड
आश्चर्य चकीतच झालो मी
गेलो क्षणभर थिजून
उलट तिच्याशी हसेपर्यंत
गेली सुद्धा निघून
अपेक्षाच नव्हती तिच्याकडून
ती वागेल असं काही
हल्लीच तर विचारलं होतं
म्हणाली होती नाही
बदलला वाटतं विचार तिचा
पडलीय वाटतं ठिणगी
चेतवला पाहिजे वणवा आता
देऊन हवा आणखी
--- लबाड बोका
आधीच आहे मनात माझ्या
तिच्याबद्दल ओढ
त्यात अचानक आली समोर
हसली एकदम गोड
आश्चर्य चकीतच झालो मी
गेलो क्षणभर थिजून
उलट तिच्याशी हसेपर्यंत
गेली सुद्धा निघून
अपेक्षाच नव्हती तिच्याकडून
ती वागेल असं काही
हल्लीच तर विचारलं होतं
म्हणाली होती नाही
बदलला वाटतं विचार तिचा
पडलीय वाटतं ठिणगी
चेतवला पाहिजे वणवा आता
देऊन हवा आणखी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा