१८२. माझी काय चूक ?
प्रेमासारखी नसते जगात
दुसरी कोणती पवित्र गोष्ट
चुंबावेसे वाटतात मला
नाजूक गुलाबी तुझे ओष्ठ
तुझाच पतंग असतो उडत
माझ्या मनाच्या आकाशात
धरावसं वाटतं मला
तुला घट्ट बाहुपाशात
कर विचार माझा जरा
समजू नकोस मला व्हिलन
करावंसं वाटतं मला
प्रेमानेच तुझ्याशी मिलन
आवडतेस तू खूप मला
लागली आहे तुझीच आस
कळू देणार नाही कुणाला
होऊ देणार नाही त्रास
आत्ता पर्यंत करत होतो
तुझ्यावरती प्रेम मूक
लग्न तुझं झालं आहे
त्यात माझी काय चूक ?
--- लबाड बोका
प्रेमासारखी नसते जगात
दुसरी कोणती पवित्र गोष्ट
चुंबावेसे वाटतात मला
नाजूक गुलाबी तुझे ओष्ठ
तुझाच पतंग असतो उडत
माझ्या मनाच्या आकाशात
धरावसं वाटतं मला
तुला घट्ट बाहुपाशात
कर विचार माझा जरा
समजू नकोस मला व्हिलन
करावंसं वाटतं मला
प्रेमानेच तुझ्याशी मिलन
आवडतेस तू खूप मला
लागली आहे तुझीच आस
कळू देणार नाही कुणाला
होऊ देणार नाही त्रास
आत्ता पर्यंत करत होतो
तुझ्यावरती प्रेम मूक
लग्न तुझं झालं आहे
त्यात माझी काय चूक ?
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा