१८६. व्यथा
माझ्याही नकळत कधी, मन माझे हे भुलले
एक एक म्हणताना मी, अनेकींना तसे चाहिले
जमलेच नाही कधी पण, तरी मन वेडे खुलले
नाही म्हणताना तसे खूप, करून प्रयत्न पाहिले
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर, उगाच मन हे झुलले
काय सांगू दुख्ख माझे, कसे मीच साहिले
कित्येक आले कित्येक गेले, कित्येक असे वसंत फुलले
करायचे होते प्रेम खूप, पण करायचेच राहिले
--- लबाड बोका

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा