१८७. भुकेला
अचानक काय होतं तुला
कळतच नाही कारण
सांगतही नाहीस काही
करतेस मौन धारण
साधताही येत नाही संवाद
होते जीवाची तगमग
सुचेनासंच होतं काही
होतो हताश मी मग
होतो जीव कासावीस नुसता
सुटत नाहीत गाठी
मी फक्त आहे भुकेला
तुझ्या प्रेमासाठी
--- लबाड बोका
अचानक काय होतं तुला
कळतच नाही कारण
सांगतही नाहीस काही
करतेस मौन धारण
साधताही येत नाही संवाद
होते जीवाची तगमग
सुचेनासंच होतं काही
होतो हताश मी मग
होतो जीव कासावीस नुसता
सुटत नाहीत गाठी
मी फक्त आहे भुकेला
तुझ्या प्रेमासाठी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा