१८९. पुन्हा
कधी कधी ती वागते अशी की
डोक्याला होतो ताप
तोंडही तिचं पाहू नये
इतका येतो संताप
धरतो मग मी अबोला तिच्याशी
पाहून तिला फिरवतो तोंड
ती मात्र वागत असते
डोकं ठेवून थंड
मारते मग ती हाक मला
बोलते लाडे लाडे
जातो मग मी पाघळून पुन्हा
पण घेतो आढेवेढे
जातो माझा राग तेव्हा
निघून कुठल्या कुठे
पुन्हा लागतो गोंडा घोळू
तिच्या मागेपुढे
--- लबाड बोका
कधी कधी ती वागते अशी की
डोक्याला होतो ताप
तोंडही तिचं पाहू नये
इतका येतो संताप
धरतो मग मी अबोला तिच्याशी
पाहून तिला फिरवतो तोंड
ती मात्र वागत असते
डोकं ठेवून थंड
मारते मग ती हाक मला
बोलते लाडे लाडे
जातो मग मी पाघळून पुन्हा
पण घेतो आढेवेढे
जातो माझा राग तेव्हा
निघून कुठल्या कुठे
पुन्हा लागतो गोंडा घोळू
तिच्या मागेपुढे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा