१९०. अलविदा
आजपासून देतो मी
सोडून तुझा नाद
तुझ्यापायी केला मी
वेळ माझा बरबाद
तुला कधीच कळली नाही
माझी प्रेम भावना
मी मात्र विसरलो होतो
मलाही आहे कणा
मी करून घेतली होती
माझीच कमी किम्मत
तू मात्र करत होतीस
माझी फक्त गम्मत
वाईट खूप वाटतंय मला
गेलाय फाटून ऊर
तुझा माझा संबंध संपला
जातो आता दूर
--- लबाड बोका
आजपासून देतो मी
सोडून तुझा नाद
तुझ्यापायी केला मी
वेळ माझा बरबाद
तुला कधीच कळली नाही
माझी प्रेम भावना
मी मात्र विसरलो होतो
मलाही आहे कणा
मी करून घेतली होती
माझीच कमी किम्मत
तू मात्र करत होतीस
माझी फक्त गम्मत
वाईट खूप वाटतंय मला
गेलाय फाटून ऊर
तुझा माझा संबंध संपला
जातो आता दूर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा