१९१. अपयश
सालं प्रत्येक वेळी तसंच
झगडावं लागतं नुसतं
तरीही मिळत नाहीच शेवटी
सगळंच कसं फसतं
किती लढवतो नाना युक्त्या
किती आणतो आव
पुन्हा पुन्हा आवाक्यात आणतो
फिस्कटलेला डाव
करतो इतके प्रयत्न तरी
मिळत नाही यश
व्हायचं तेच होतं शेवटी
होतंच नाही वश
--- लबाड बोका
सालं प्रत्येक वेळी तसंच
झगडावं लागतं नुसतं
तरीही मिळत नाहीच शेवटी
सगळंच कसं फसतं
किती लढवतो नाना युक्त्या
किती आणतो आव
पुन्हा पुन्हा आवाक्यात आणतो
फिस्कटलेला डाव
करतो इतके प्रयत्न तरी
मिळत नाही यश
व्हायचं तेच होतं शेवटी
होतंच नाही वश
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा