१९६. गुलाबी कोडं
तुझ्यासाठीच मी करतो कविता
पण तुलाच नाही कळत
तू आपली आतल्याआत
उगाच बसतेस जळत
तूच तर देतेस मला
कवितांसाठी विषय
तुझ्याचभोवती असतो फिरत
शब्दांमागचा आशय
मलाही आहे कुतूहल खूप
पण आवरून धरतो घोडं
तू तर आहेस माझ्यासाठी
अजूनही गुलाबी कोडं
--- लबाड बोका
तुझ्यासाठीच मी करतो कविता
पण तुलाच नाही कळत
तू आपली आतल्याआत
उगाच बसतेस जळत
तूच तर देतेस मला
कवितांसाठी विषय
तुझ्याचभोवती असतो फिरत
शब्दांमागचा आशय
मलाही आहे कुतूहल खूप
पण आवरून धरतो घोडं
तू तर आहेस माझ्यासाठी
अजूनही गुलाबी कोडं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा