१९३. फशी
कधी काळी तुझ्याबद्दल
वाटत होती ओढ
तेव्हा तुझं सगळं काही
वाटत होतं गोड
पडलो होतो प्रेमात तुझ्या
झालो होतो वेडा
गाणी सुद्धा म्हणायचो आणि
नाचायचो थोडा थोडा
तुझीच स्वप्नं पहायचा
लागला होता नाद
तुझ्यासाठी कोणाशीही
घालायचो मी वाद
तुझ्यावरती केवढातरी
होता माझा विश्वास
तूच होतीस माझ्यासाठी
अन्न पाणी श्वास
तुझ्यापायी सगळ्यांशी मी
झालो होतो वाकडा
एवढा होता आवडला मला
तुझा सुंदर मुखडा
माहित नव्हतं तेव्हा मला
तू आहेस अशी
तू नाहीस पाडलंस पण
मीच पडलो फशी
--- लबाड बोका
कधी काळी तुझ्याबद्दल
वाटत होती ओढ
तेव्हा तुझं सगळं काही
वाटत होतं गोड
पडलो होतो प्रेमात तुझ्या
झालो होतो वेडा
गाणी सुद्धा म्हणायचो आणि
नाचायचो थोडा थोडा
तुझीच स्वप्नं पहायचा
लागला होता नाद
तुझ्यासाठी कोणाशीही
घालायचो मी वाद
तुझ्यावरती केवढातरी
होता माझा विश्वास
तूच होतीस माझ्यासाठी
अन्न पाणी श्वास
तुझ्यापायी सगळ्यांशी मी
झालो होतो वाकडा
एवढा होता आवडला मला
तुझा सुंदर मुखडा
माहित नव्हतं तेव्हा मला
तू आहेस अशी
तू नाहीस पाडलंस पण
मीच पडलो फशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा