१९९. हिरवा चाफा
ती करते हाय हॅल्लो
मी ही करतो चौकशी
प्रश्न पडतो प्रेमाचं असं
काय बोलू हिच्याशी
दिसतात प्रेमीजन बसलेले
तासन् तास डोलत
तेव्हाही वाटत असतं मला
काय असतील हे बोलत
पटली आहे आता ती तर
झालेत असे वांदे
कवितांमधून तर सोलत होतो
नाकाने भरपूर कांदे
आपल्या तर होत्या साल्या
तोंडाच्या नुसत्याच वाफा
तरी आज देईन म्हणतो
तिला हिरवा चाफा
--- लबाड बोका
ती करते हाय हॅल्लो
मी ही करतो चौकशी
प्रश्न पडतो प्रेमाचं असं
काय बोलू हिच्याशी
दिसतात प्रेमीजन बसलेले
तासन् तास डोलत
तेव्हाही वाटत असतं मला
काय असतील हे बोलत
पटली आहे आता ती तर
झालेत असे वांदे
कवितांमधून तर सोलत होतो
नाकाने भरपूर कांदे
आपल्या तर होत्या साल्या
तोंडाच्या नुसत्याच वाफा
तरी आज देईन म्हणतो
तिला हिरवा चाफा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा