२००. प्रश्न
असतो असा बेसावध मी
अचानक येते तुझी आठवण
आणि उलगडतो डोळ्यांसमोर
आठवणींचा जुना पट
जातं मन आपोआपच
पुन्हा मग भूतकाळात
का असेल घडली भेट
नव्हतीसच जर तू भाळात
येतात विचार जस जसे
डोकं जातं नुसतं भणाणून
करतो प्रयत्न विसरण्याचा
तरीही येतात पुन्हा उफाळून
नकोच वाटतात त्या आठवणी
नकोच वाटतं ते दुख्ख
अजून सतावतोय प्रश्न मला
कशी राहिलीस तेव्हा तू मख्ख
--- लबाड बोका
असतो असा बेसावध मी
अचानक येते तुझी आठवण
आणि उलगडतो डोळ्यांसमोर
आठवणींचा जुना पट
जातं मन आपोआपच
पुन्हा मग भूतकाळात
का असेल घडली भेट
नव्हतीसच जर तू भाळात
येतात विचार जस जसे
डोकं जातं नुसतं भणाणून
करतो प्रयत्न विसरण्याचा
तरीही येतात पुन्हा उफाळून
नकोच वाटतात त्या आठवणी
नकोच वाटतं ते दुख्ख
अजून सतावतोय प्रश्न मला
कशी राहिलीस तेव्हा तू मख्ख
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा