२०२. वचन
उगाच तुला वाटत असतं
देत नाही तुला भाव
माझं असतंच लक्ष तुझ्यावर
घेत असतो तुझाच ठाव
गाजवायचा नाहीय अधिकार मला
जगू द्यायचंय तुला मुक्त
माझं आहेच प्रेम तुझ्यावर
सारखं सांगत नाहीय फक्त
उगाच करतेस विचार एवढा
उगाच आणि होतेस दु:खी
खरंच देईन साथ तुला
खरंच करीन तुला सुखी
--- लबाड बोका
उगाच तुला वाटत असतं
देत नाही तुला भाव
माझं असतंच लक्ष तुझ्यावर
घेत असतो तुझाच ठाव
गाजवायचा नाहीय अधिकार मला
जगू द्यायचंय तुला मुक्त
माझं आहेच प्रेम तुझ्यावर
सारखं सांगत नाहीय फक्त
उगाच करतेस विचार एवढा
उगाच आणि होतेस दु:खी
खरंच देईन साथ तुला
खरंच करीन तुला सुखी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा