२०५. परिणाम
वाटतंय सगळं उदास आणि
मनही झालंय खिन्न
दिसत नाहीस तू तर
वाटतंय सगळं भिन्न
लागत नाही मन कशात
वाटत नाही चुरस
तुझ्याशिवाय सगळं कसं
वाटतं एकदम निरस
आजूबाजूचे रंग सुद्धा
वाटतात आता फिके
आणि सगळे आवाज सुद्धा
वाटू लागलेत मुके
पक्ष्यांची गोड किलबिल सुद्धा
वाटते आता कर्कश
बदलून गेलेत संदर्भ सगळे
बदलून गेलेत निकष
जावं वाटतं निघून आता
घेत घेत हरीनाम
तुझ्या फक्त नसण्याचा
झालाय केवढा परिणाम
--- लबाड बोका
वाटतंय सगळं उदास आणि
मनही झालंय खिन्न
दिसत नाहीस तू तर
वाटतंय सगळं भिन्न
लागत नाही मन कशात
वाटत नाही चुरस
तुझ्याशिवाय सगळं कसं
वाटतं एकदम निरस
आजूबाजूचे रंग सुद्धा
वाटतात आता फिके
आणि सगळे आवाज सुद्धा
वाटू लागलेत मुके
पक्ष्यांची गोड किलबिल सुद्धा
वाटते आता कर्कश
बदलून गेलेत संदर्भ सगळे
बदलून गेलेत निकष
जावं वाटतं निघून आता
घेत घेत हरीनाम
तुझ्या फक्त नसण्याचा
झालाय केवढा परिणाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा