२०६. बदनाम
उगाच नाही रहिलो काही
अजून असा एकटा
आवडलोच नाही कोणाला मी
नव्हतो जरी नकटा
कोणालाच नाही वाटला कधी
माझा काही नेम
आणि तू मात्र करते आहेस
माझ्यावरती प्रेम
म्हणून येते कीव तुझी
आणि वाटते दया
मी तर आहे अगोदरच
गेलेलो पुरता वाया
वाटत नाही पण मला
तुला फसवावंसं
खरं सांगितलेलं असतं बरं
होत असलं जरी हसं
प्रेमात माझ्या पडून तू
झाली आहेस नाकाम
माहित नाही तुला पण
मी आहे बदनाम
--- लबाड बोका
उगाच नाही रहिलो काही
अजून असा एकटा
आवडलोच नाही कोणाला मी
नव्हतो जरी नकटा
कोणालाच नाही वाटला कधी
माझा काही नेम
आणि तू मात्र करते आहेस
माझ्यावरती प्रेम
म्हणून येते कीव तुझी
आणि वाटते दया
मी तर आहे अगोदरच
गेलेलो पुरता वाया
वाटत नाही पण मला
तुला फसवावंसं
खरं सांगितलेलं असतं बरं
होत असलं जरी हसं
प्रेमात माझ्या पडून तू
झाली आहेस नाकाम
माहित नाही तुला पण
मी आहे बदनाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा