२०९. सल्ला
माझ्याच भवितव्याबद्दल
मीच आहे साशंक
आणखी कुणाचं आयुष्य
लावू कसं पणाला
अगोदरच केले आहेत एवढे
आयुष्यामध्ये उपद्व्याप
ताक सुद्धा वाटतं आता
फुंकून फुंकून प्यावं
तू नको राहूस अशी
माझ्या आशेवरती
मलाच नाही वाटत
माझंच काही खरं
तुला कोणी भेटेल चांगला
आयुष्य लागेल मार्गी
मला ज्यांनी दिला नकार
त्या सगळ्या झाल्या सुखी
--- लबाड बोका
माझ्याच भवितव्याबद्दल
मीच आहे साशंक
आणखी कुणाचं आयुष्य
लावू कसं पणाला
अगोदरच केले आहेत एवढे
आयुष्यामध्ये उपद्व्याप
ताक सुद्धा वाटतं आता
फुंकून फुंकून प्यावं
तू नको राहूस अशी
माझ्या आशेवरती
मलाच नाही वाटत
माझंच काही खरं
तुला कोणी भेटेल चांगला
आयुष्य लागेल मार्गी
मला ज्यांनी दिला नकार
त्या सगळ्या झाल्या सुखी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा