२०८. कारण
मला तशी लागली होती
थोडी थोडी चाहूल
मनात माझ्या फुलून आलंय
एक अनामिक फूल
सुटला आहे दरवळ त्याचा
मनही झालंय गंधित
आतासा मी असतो म्हणून
एका वेगळ्याच धुंदीत
थंडी सुद्धा वाटू लागलीय
आता खरी गुलाबी
कळू लागलं आहे आता
काय असते बेताबी
प्रेममय झाल्यासारखं वाटतंय
सगळंच वातावरण
प्रेमामध्ये पडलो आहे
एवढंच घडलंय कारण
--- लबाड बोका
मला तशी लागली होती
थोडी थोडी चाहूल
मनात माझ्या फुलून आलंय
एक अनामिक फूल
सुटला आहे दरवळ त्याचा
मनही झालंय गंधित
आतासा मी असतो म्हणून
एका वेगळ्याच धुंदीत
थंडी सुद्धा वाटू लागलीय
आता खरी गुलाबी
कळू लागलं आहे आता
काय असते बेताबी
प्रेममय झाल्यासारखं वाटतंय
सगळंच वातावरण
प्रेमामध्ये पडलो आहे
एवढंच घडलंय कारण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा